कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत युसूफ मेहेरअली सेंटरकडून जनजागृती

पनवेल : वार्ताहर

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण तसेच आदिवासी भागामध्ये अनेक अफवा पसरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. रायगड जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी लोकजागृतीसाठी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले होते. या अवाहनाला प्रतिसाद देत पनवेल तालुक्यातील युसूफ मेहेरअली सेंटरच्या वतीने गावोगावी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

सेंटरचे प्रकल्प संचालक सुरेश रासम यांच्या पुढाकाराने पनवेल तालुक्यातील पळस्पे, तुरामले, सांगूरली, शिरढोन, चिरवत, चिंचवन, कल्हे, बांधनवाडी, तारा, डोलघर, बारापाडा, दिघाटी, साई, कासारभाट तर पेण तालुक्यातील खारपाडा, रावे, खरोशी, दुरशेत, बळवली, शितोळे वाडी, गोविर्ले, हमरापूर, तांबदशेत,जोहे, कळवे, दादर, वरेडी या गावांसह आजूबाजूच्या आदिवासीवाड्यात जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

सेंटरच्या सामाजिक कार्यकर्त्या मालती म्हात्रे, संतोष ठाकूर, तेजस चव्हाण, अंकूश जाधव, रहेमान शेख, बाळकृष्ण सावंत, हरिश्चंद्र वाघे, संतोष ठाकूर, रामदास गुरमे, संतोष हापसे आणि देविदास पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते पेण तालुक्यातील गावांमध्ये जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनाची माहिती देत. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी आणि लसीकरणासाठी ’कोविन, आरोग्य सेतू आणि उमंग या अ‍ॅप्लिकेशनद्वारे नोंदणीची माहीती देत आहेत.

दरम्यान, हे कार्यकर्ते गावात पोहचल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष मोहिमेत सहभाग घेत व जनजागृती करणार्‍या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करीत असे.

Check Also

Пинко казино: Азартные игры или развлечение?

Пинко казино: Азартные игры или развлечение? Вопрос о том, является ли Пинко казино азартной игрой …

Leave a Reply