Breaking News

सुशील कुमारची माहिती देणार्‍याला दिल्ली पोलिसांकडून एक लाखांचे बक्षीस जाहीर

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

दिल्लीतील कुस्तीपटूच्या खूनप्रकरणी ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारची माहिती देण्यार्‍याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माजी ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीपटू सागर राणाची नवी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगच्या बाहेर हत्या झाली होती. या प्रकरणात सुशील कुमारचेही नाव समोर आले होते. याल सुशीलचा साथीदार अजय कुमार याची माहिती देणार्‍यालाही 50 हजारांचे बक्षिस देण्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केले आहे. सुशील कुमार आणि त्याचा साथीदार यांच्या शोध आमची पथके घेत आहेत. दोघांच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. याच्यानंतरही ते पोलिसांपासून पळत आहेत. त्यामुळे दोघांच्या अटकेसाठी बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे, असे दिल्लीच्या डीसीपी उषा रंगनाणी यांनी सांगितले. पोलिसांनी याआधी सुशील कुमारच्या घरावर छापा टाकला होता, मात्र तो तिथे नव्हता. त्यानंतर पोलिसांनी सुशील कुमार विरुद्ध लुक आऊट नोटीस जारी केली. त्यानंतरदेखील सुशील कुमारचा शोध न लागल्यामुळे त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी सुशील कुमारने आधीच जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply