Breaking News

सुधागड पेडली येथे फसला ट्रेलर

पाली-खोपोली राज्यमहामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

पाली : प्रतिनिधी

पाली-खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. या राज्य महामार्गावरील पेडली (ता. सुधागड) गावाजवळ  गुरुवारी (दि. 20) सायंकाळी मोठा ट्रेलर मोरीमध्ये फसला होता. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली होती. हा ट्रेलर रात्री उशिरा बाहेर काढण्यात आला. त्यानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली.

पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पेडली गावाजवळ एका मोरीचे काम सुरु आहे. गुरुवारी या मोरीमध्ये मोठा ट्रेलर फसला. त्यामुळे या राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रात्री उशीरा हा टेलर बाहेर काढण्यात आला असून, त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली असल्याची माहिती तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी दिली.

Check Also

पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या …

Leave a Reply