Breaking News

कळंबोली वसाहतीत गरजूंना धान्यवाटप

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

कळंबोली : बातमीदार

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू जनतेला एक मदतीचा हाथ म्हणून कळंबोली वसाहतीमधील हजारो गरीब व गरजू नागरिकांना मोफत वाटपाचा कार्यक्रम सोमवारी (दि. 24) राबविण्यात आला. या वेळी धान्यवाटप केल्यानंतर नागरिकांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दीर्घ आयुष्य लाभू दे असे आशीर्वादही नागरिकांनी दिले.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त पनवेल परिसरात धान्यवाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा लाभ तळागाळातील गरीब आणि गरजू घटकांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या चाहत्यांनी गेल्या काही दिवसांत आरोग्य शिबिर, अपंग विद्यार्थी, कला, क्रीडा, सामाजिक कार्यात काम करणार्‍या नागरिकांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त विविध योजनांच्या माध्यमातून मदत केली आहे. कळंबोली केलेल्या वाटपाच्या वेळी सोशल डिस्टन्सिंगचे व्यवस्थित पालन करून नागरिकांनी धान्य वाटपाचे किट स्वीकारले. कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन मोफत धान्यवाटप करण्याचे नियोजन केले आहे.

या कार्यक्रमात नगरसेवक बबन मुकादम, मा. सभापती नगरसेवक अमर पाटील, नगरसेवक हरेश केणी, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, नगरसेविका प्रमिला पाटील, मा. सभापती प्रिया मुकादम, भाजप कार्यकर्ते कमल कोठारी, बबन बारगजे, प्रकाश शेलार, अमर ठाकूर, प्रकाश मुंबईकर, दिलीप बिष्ट, संतोष गायकवाड, सिद्धेश बनकर, केशव यादव, अजर शेख भाजप पदाधिकार व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

नवी मुंबई विमानतळाला ‌‘दिबां‌’चे नाव द्या; भाजपचे लक्षवेधी आंदोलन

पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी …

Leave a Reply