पनवेल ः रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा येत्या 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाला सोमवारपासून प्रारंभ झाला.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या सुयोग्य नियोजनातून तालुक्यातील गावागावांमध्ये गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तिसर्या दिवशी म्हणजेच बुधवारी (दि. 26) बोनशेत, टेंभोडे, नेवाळी, भोकरपाडा, चिंध्रण आदी गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. या वेळी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत व अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
Check Also
अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती
भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …
RamPrahar – The Panvel Daily Paper