Breaking News

दुखापतीमुळे बार्टीची फ्रेंच ओपनमधून माघार

पॅरिस ः वृत्तसंस्था

अग्रमानांकित अ‍ॅशले बार्टी हिने दुखापतीमुळे फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीच्या सामन्यातून माघार घेतली आहे. महिलांमध्ये नवव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिला पराभवाचा धक्का सहन करावा लागला असला तरी सोफिया केनिन, एलिना स्वितोलिना आणि डॅनिल मेदवेदेव यांनी तिसर्‍या फेरीत प्रवेश मिळवला आहे. 2019मध्ये विजेतेपद पटकावणारी बार्टी पोलंडच्या मॅगदा लिनेटविरुद्धच्या सामन्यात 1-6, 2-2 अशा पिछाडीवर पडली होती. अखेर आपण या सामन्यात दुखापतीमुळे खेळणार नसल्याचे तिने खुर्चीवरील पंचांना सांगितले. डाव्या पायाला पट्ट्या बांधूनच बार्टी या सामन्यासाठी मैदानावर उतरली होती. लिनेटचे फटके परतवताना, प्रदीर्घ रॅलीदरम्यान तसेच सर्व्हिस टाकतानाही तिला त्रास होत होता. पहिल्या सेटच्या अखेरीस तिने उपचारासाठी वेळ  मागितला होता.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply