नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त
क्रीडाक्षेत्रात कार्यरत असलेल्या क्रीडाराधना या समूहाच्या वतीने नुकतेच बुद्धिबळ परिचय या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने झाला.
गुगल मीट आणि फेसबुक लाइव्हवरून झालेल्या या कार्यक्रमात मुंबईच्या चॅलेंजर चेस अॅकॅडमीचे अध्यक्ष शरद वझे यांनी मार्गदर्शन केले. वझे हे पहिल्या जागतिक ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे टेबल डिरेक्टर तसेच 165 स्पर्धकांबरोबर सलग 12 तास बुद्धिबळ खेळून लिम्का बुकमध्ये नोंद करणारे प्रसिद्ध बुद्धिबळपटू आहेत.
नवीन पनवेल ब्राह्मण सभा या संस्थेच्या वतीने क्रीडाराधना समूहाची निर्मिती करण्यात आली असून या माध्यमातून विविध क्रीडाविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या समूहाच्या समन्वयक मंजुषा भावे, मुग्धा अंबेकर तसेच युवोन्मेष समूहाचे शार्दूल दामले, संकेत आराध्ये, देवेश पेंडसे आदी युवकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. राज्यभरातील बुद्धिबळप्रेमीनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
Check Also
चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ -मुख्यमंत्री फडणवीस
रायगड : प्रतिनिधीमहाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र …
RamPrahar – The Panvel Daily Paper