Breaking News

नवीन पनवेलमध्ये कुष्ठरुग्णांचे लसीकरण

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे आणि भाजप कार्यकर्ते अशोक आंबेकर यांच्या मागणीनुसार नवीन पनवेल येथील प्रभाग क्रमांक 17मध्ये लोकमान्य वसाहत या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने पनवेल येथील कुष्ठरोग झालेल्या रुग्णांसाठी विशेष लसीकरण सत्राचे सोमवारी (दि. 14) आयोजन करण्यात आले होते. या वेळी 11 कुष्ठरुग्णांचे कोविड लसीकरण करण्यात आले. या वेळी प्रभागाच्या नगरसेविका अ‍ॅड. वृषाली जितेंद्र वाघमारे, वैद्यकीय अधिकारी आनंद गोसावी, डॉ. मनीषा चांडक, डॉ. नेहा गांगुर्डे, भाजपचे कार्यकर्ते अशोक आंबेकर, संजय जाधव तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-2ची लसीकरण टीम उपस्थित होती.

Check Also

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची निवड

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी पुन्हा एकदा …

Leave a Reply