नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारताचा उंच उडीपटू मरियप्पन थांगाव्हेलूची भारतीय पॅरालिम्पिक पथकाचा ध्वजवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मरियप्पनने रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.
भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कार्याध्यक्ष आर. सत्यनारायण यांनी दिली.
दरम्यान, चेक प्रजासत्ताकने व्हिसा नाकारल्यामुळे भारतीय तिरंदाजांना जागतिक मानांकन स्पर्धा या अखेरच्या पॅरालिम्पिक पात्रता स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. चेक प्रजासत्ताकने अत्यंत उच्च जोखीम असलेल्या देशांमध्ये भारत आणि ब्राझीलचा समावेश केला आहे. त्यामुळे भारताच्या 11 सदस्यीय संघाला 3 ते 10 जुलै या कालावधीत होणार्या स्पर्धेला मुकावे लागले आहे.
Check Also
श्रीगणेशोत्सव आणि मनोरंजनक्षेत्र यांच्या नात्याची गोष्ट
आजच्या श्रीगणेशोत्सवात हमखास दिसणारी फिल्मी गोष्ट म्हणजे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक लहान मोठ्या सेलिब्रिटीजनी …
RamPrahar – The Panvel Daily Paper