श्रीनगर ः जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा जवानांना यश आले आहे. सुरक्षा जवानांनी कुलगाम व पुलवामा येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी पार पडलेल्या चकमकींमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. कुलगाम जिल्ह्यातील झोदार परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर जवानांनी परिसर सील करीत सर्च ऑपरेशन सुरू केले होते. या वेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला व चकमकीला सुरुवात झाली. चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले. तसेच पुलवामात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी व हंडवारा येथे एक दहशतवादी ठार करण्यात आला. हिजबुलचा टॉप दहशतवादी मेहरजुद्दीन उर्फ उबैद हंडवारामधील चकमकीत मारला गेला आहे.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper