कर्जत : वर्षासहलीसाठी आलेल्या मुंबईच्या कुर्ला येथील तीन जणांचा कर्जत तालुक्यातील पाली भूतीवली धरणात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि. 10) दुपारी घडली. कुर्ल्यातील नौपाडा नानीबाई चाळ येथील सहा पर्यटक वर्षासहलीसाठी कर्जतमध्ये आले होते. यातील चार जण पाली भूतीवली धरणाच्या पाण्यात उतरले होते, मात्र त्यापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला, तर एक जण पाण्याबाहेर येण्यात यशस्वी ठरला. साहिल हिरालाल त्रिभुके (15), प्रीतम गौतम साहू (12) आणि मोहन साहू (16) अशी मृतांची नावे असून तिघेही अल्पवयीन आहेत. याबाबत स्थानिक आदिवासी लोकांनी कळविल्यावर नेरळ पोलीस घटनास्थळी पोहचले. सायंकाळी उशिरा तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Check Also
25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …