Breaking News

कालिदास कोळंबकर भाजपत दाखल

मुंबई : प्रतिनिधी

काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार राहुल शेवाळेंना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत काँग्रेसला धक्का बसला आहे. कट्टर राणे समर्थक मानले जाणारे कोळंबकर लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केल्यानं कोळंबकर आणि काँग्रेसमध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर आता कोळंबकर यांनी थेट युतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी बुधवारी कोळंबकर यांची भेट घेतली.

जनतेला लोकप्रतिनिधींकडून कामं हवी आहेत. जी व्यक्ती कामं करुन देते, जनता त्याच्याच पाठिशी उभी राहते. मुख्यमंत्री प्रलंबित कामं मार्गी लावतात. त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं, तर त्यात गैर काय?, असा प्रश्न कोळंबकर यांनी विचारला. कोळंबकर यांनी पाठिंबा दिल्यानं शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आनंद व्यक्त केला. कोळंबकर माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. त्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य मिळाल्यानं माझा विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Check Also

पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या …

Leave a Reply