Breaking News

नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या हस्ते खारघरमध्ये कोरोना लसीकरणाचा प्रारंभ

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघर सेक्टर 20 येथील पोलारीस हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची सुरुवात नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या हस्ते व भाजप खारघर तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

या वेळी पोलारीस हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अजिंक्य भंडारी, डॉ. अतुल खरात व इतर कर्मचारी उपस्थित होते. शहरातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस आणि दुसरा डोस शासकीय दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. नागरिकांनी या केंद्राचा लाभ घ्यावा, डोसची किंमत 780 रुपये असून लसीकरण नोंदणी करण्यासाठी 9372338820 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण स्थापन करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी मुंबई : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील झपाट्याने …

Leave a Reply