मुंबई ः प्रतिनिधी
राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले असले, तरी मुंबई लोकल अद्यापही सर्वसामान्यांसाठी बंद आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने ठाकरे सरकारला झापत बसमधली गर्दी चालते, तर मग लोकलमधील गर्दी का नाही, अशी विचारणा केली. त्याचप्रमाणे लसीच्या दोन मात्रा घेतलेले नागरिक, पत्रकारांना लोकलमधून प्रवास करण्यास मुभा देण्याचा विचार करा, असेही सूचित केले. कोर्टाने सरकारला पुढील गुरुवारी भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.