Breaking News

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर बिस्कीटचा टेम्पो उलटला

कर्जत : बातमीदार

चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कर्जत- कल्याण राज्यमार्गावरील आषाणे गावाजवळ सोमवारी (दि. 16) पारले बिस्किटांचा टेम्पो उलटला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, मात्र स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

पारले कंपनीचे बिस्किटे भरलेला टेम्पो सोमवारी कर्जतहून कल्याणच्या दिशेने जात होता. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने आषाणे गावाजवळ असलेल्या वळणावर हा टेम्पो उलटला. वेग जास्त असल्याने हा टेम्पो रस्त्यावरून काही अंतरापर्यंत घसरत गेला. या अपघातानंतर काही काळ या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू होती.

भरधाव वेग आणि चालकाचा वाहनावरील ताबा सुटत असल्याने अलीकडे अपघातांमध्ये वाढ झाली आहे.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply