पनवेल ःकेंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रविवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ना. कपिल पाटील यांचे स्वागत केले. महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर सोबत होते. काही दिवसांपूर्वीच ना. पाटील जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने पनवेलमध्ये होते. त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. त्यानंतर त्यांनी रविवारी दुसर्यांदा येथे येऊन ठाकूर कुटुंबीयांशी सुसंवाद साधला.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper