ठाणे ः प्रतिनिधी
कोरोना प्रादूर्भावामुळे दहीहंडीला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे, पण मनसेने हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सोमवारी (दि. 30) भगवती मैदानावर आंदोलन केले. जुहूमधील ना. नारायण राणेंच्या घरासमोर शेकडो शिवसैनिक जमले ते चालते. यांचा (मुख्यमंत्र्यांचा) भाचा शेकडो लोकांना घेऊन आंदोलन करतो ते चालते, मात्र हिंदूंचे सण म्हटल्यावर कोरोनाचे कारण दिले जाते. याचे राजकारण करताना कोरोना आडवा येत नाही. असा कोणता कोरोना आहे जो उद्धव ठाकरेंच्या लोकांना होत नाही, पण हिंदू सणांमध्ये पसरतो, असा सवाल या वेळी जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
उद्धव ठाकरे हिंदू शब्दच विसरले
आपण माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहात हे लक्षात ठेवावे, असा उल्लेख करीत मनसेचे नेते अविनाश जाधव म्हणाले की, राज्यात आता जर भाजप सत्तेत असता, तर उद्धव ठाकरे यांनी हिंदू हिंदू केले असते, मात्र ते महाविकास आघाडी सरकारसोबत सत्तेत आल्यापासून हिंदू शब्दच विसरले आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper