पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात विविध विकास कामे करण्यात येत आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांनी अजिवली बस स्टॉप ते हनुमान मंदिराचे काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. बुधवारी (दि. 1) काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचे लोकार्पण भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या लोकार्पण सोहळ्याला तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जि. प. सदस्य अमित जाधव, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, माजी उपसभापती वसंत काठवलेे, कोन ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश म्हात्रे, राजेश पाटील, ज्ञानेश्वर भागीत, जगन्नाथ साडकर, महेश माळी, सुरज गायकर, अप्पा भागीत, अनंता शेडगे, अमित भागीत, सुनील भागीत, संतोष पाटील, राजेश काठवले, कैलास पाटील, राहुल घरत, संतोष दातारे, घनश्याम पाटील, गणेश पाटील, सरपंच नामदेव पाटील, मच्छींद्र दुर्गे, योगेश लहाने, सुभाष जेठू पाटील, निवृत्ती शेंदरे, संदेश पाटील, दिनेश पाटील, सूर्यकांत पाटील, नारायण भोपी, अनंत पवार, चेतन जाधव तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे तालुक्यात वेळोवेळी विकासाची कामे केली जात आहेत, असे मत तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी या वेळी व्यक्त केले.
कॉलेज इमारतीचे नुतनीकरण व वर्ग खोलीचे उद्घाटन
अजिवली येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या जनता विद्यामंदिर विद्यालयात वर्ग खोलीचे लोकार्पण, ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमस संकुलाचा विकास आणि इमारतीचे नुतनीकरण सोहळा बुधवारी (दि. 1) झाला. भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कॉलेज इमारत नुतनीकरणाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते व वर्ग खोलीचे लोकार्पण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले.
पनवेल तालुक्यातील अजिवली येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या जनता विद्यामंदिर विद्यालयात रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि कै. अनुसया हरिश्चंद्र पाटील व कै. हरिश्चंद्र लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने वर्ग खोली बांधून दिली आहे. या वर्गखोलीचे लोकार्पण उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले तसेच ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्सच्या संपुर्ण संकुलाचा विकास आणि इमारतीचा नुतनीकरणाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्याला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महाराष्ट्र प्रदेश कामगार सेल सचिव सुभाष जेठू पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, कोन ग्रापंचायतीचे सरपंच निलेश म्हात्रे, रायगड जिल्हा संस्थेचे निरीक्षक संजय महाजन, विभाग प्रमुख सांगळे, जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भुपेंद्र पाटील, योगेश लहाने, ज्ञानेश्वर भागीत, जग्गनाथ सावडकर, महेश माळी आदी उपस्थित होते.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …