पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने बाप्पा मोरया घरगुती पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धा पनवेल शहर अंतर्गत प्रभाग क्रमांक 14, 18, 19 व 20 करिता मर्यादित असून स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 25 हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. नाव नोंदणीची अंतिम तारीख 8 सप्टेंबर आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी 7757000000 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन सभागृह नेते व कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी केले आहे.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …