पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा पनवेल तालुका व शहर मंडलच्या वतीने मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात रविवारी (दि. 5) सकाळी 10 वाजल्यापासून रंगणार आहे. विजेत्यांना रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष अॅड. माधवी नाईक, चित्रा वाघ, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्मिता जाधव, पनवेल पं. स. सभापती देवकीबाई कातकरी, जि. प. सदस्य रेश्मा शेळके, पं. स. सदस्य तथा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, पं. स. सदस्य रेखा म्हात्रे, तनुजा टेंबे, लोककला अकॅडमी मुंबई विद्यापीठाच्या प्रा. हेमाली शेडगे, परीक्षक अनघा तांबोळी, फोक आर्टच्या मयुरी शिंदे, भाजप उत्तर रायगड जिल्हा चिटणीस व नगरसेविका चारुशीला घरत, प्रदेश सदस्य व नगरसेविका दर्शना भोईर, मनपा महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती अनिता पाटील, हेमलता म्हात्रे, सुशिला घरत, नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे, सीता पाटील, राजश्री वावेकर, रूचिता लोंढे यांची उपस्थिती असणार आहे.
या स्पर्धात्मक कार्यक्रमास आजी माजी नगरसेविका, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्या महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शहर अध्यक्ष वर्षा नाईक यांनी केले आहे.
Check Also
The member group is always indeed there to aid when needed
Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …
RamPrahar – The Panvel Daily Paper