Breaking News

खालापुरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी

नगरपंचायत हद्दीतील शिरवली आदिवासीवाडीमध्ये बुधवारी (दि. 8) मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजित करण्यात आले होते.

 खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार शाह यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. आदिवासी भागात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केल्याबद्दल डॉ. शाह यांनी समाधान व्यक्त केले.

कोरोना संसर्ग आणि साथीचे आजार याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी गरजेचे होते. त्याला येथील आदिवासी बांधवांनी प्रतिसाद दिल्याने शिबिराचा उद्देश पूर्ण झाला असल्याचे मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे यांनी या वेळी सांगितले.

डॉ. प्रियांका गायकवाड, डॉ. पियुष गायकवाड, डॉ. महादेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबिराचा लाभ 82 महिला व 20 पुरुषांनी घेतला. भाजप खालापूर शहर अध्यक्ष राकेश गव्हाणकर, श्रीकांत खडकबाण, मारूती पवार व अनंता वाघमारे यांनी या शिबिराच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply