Breaking News

अदाड पूल खचला; अधिकार्यांकडून पाहणी

उसरोली ग्रामपंचायतीने वेधले होते लक्ष

मुरूड : प्रतिनिधी

तालुक्यातील अदाड गावाजवळील पूल हा मोडकळीस आला असून, पुराच्या पाण्यामुळे खचलासुद्धा आहे. तेथे नवीन पूल बांधावा, अशी मागणी उसरोली ग्रामपंचायतीने  रायगड जिल्हा परिषदेकडे केली होती. त्यानुसार जिपच्या

तज्ज्ञ अधिकार्‍यांनी या पुलाची पाहणी केली.

मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीमधील अदाड गावाजवळ 1970 मध्ये पूल बांधण्यात आला होता. तो आता जीर्ण व कमकुवत झाला आहे. जुलै आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात पुलाचा काही भाग व भराव वाहून गेल्याने हा पूल धोकादायक झाला आहे. सदरचा पूल नवीन स्वरूपात व उंच बांधण्यासाठी मोठ्या रकमेची तरतूद करण्याची मागणी उसरोली ग्रामपंचायतीचे सरपंच मनीष नांदगावकर यांनी रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता बारदस्कर यांच्याकडे केली होती.

रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याकडून तज्ज्ञ अधिकारी सचिन पोरे यांनी अदाड पुलाची नुकतीच पाहणी केली. या पुलाचा स्लॅब कमकुवत झाला असून त्यातून लोखंडी सळ्या दिसत आहेत. कठडे तुटले आहेत पोरे यांनी परीक्षणात नमूद केले असून सदरचा पूल नवीन बांधणे आवश्यक असल्याचे मत नोंदविले आहे. सचिन पोरे यांनी अहवाल सादर केल्यानंतर निधीची तरतूद होताच अदाड पुलाच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे. याबाबत जि. प.च्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply