Breaking News

कर्जतमध्ये बोहरी समाजाकडून स्वच्छता कर्मचार्यांचा सत्कार

कर्जत : प्रतिनिधी

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून बोहरी समाज, प्रोजेक्ट राईज आणि बुरहानी गार्ड्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 2) कर्जत नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचार्‍यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सत्कार करण्यात आला.

कर्जत नगर परिषदेच्या सभागृहात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. हुसेन जमाली यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू विषद केला. त्यानंतर नगर परिषदेच्या स्वच्छता कामगारांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला, तसेच आरोग्य निरीक्षक सुदाम म्हसे, पत्रकार विजय मांडे, प्रशांत खराडे, लसीकरण संघर्ष समितीचे अ‍ॅड. कैलास मोरे, विनोद पांडे, शिवसेवक गुप्ता, प्रशांत उगले, अजय वर्धावे आदींचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, दाऊदी बोहरी समाजाचे आमिल शेख, माजी नगरसेवक झुलकर डाभिया, शब्बीर धरीवाला, अमूर खारिजियाच्या फातेमा जमाली आदी उपस्थित होते.

Check Also

‘रयत‌’च्या शाखाप्रमुखांची सहविचार सभा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले मार्गदर्शन; गुणवंत शिक्षकांचा सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्तआपले कामकाज वेळच्या …

Leave a Reply