Breaking News

पीओपी बंदी उठवण्यासाठी मूर्तिकार जाणार दिल्लीत; आमदार महेश बालदी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांचा पुढाकार

पेण : प्रतिनिधी

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांची पुढील वर्षी गणेशोत्सवापासून अंमलबजावणी करण्याचे ठरले असून प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) हद्दपार करण्याचा निर्णय पर्यावरण खात्याने घेतला आहे. त्यामुळे गणेशमूर्ती कारखानदार पीओपीवरील बंदी उठवण्यासाठी दिल्लीत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेणार आहेत. यासाठी उरणचे आमदार महेश बालदी व भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी पुढाकार घेतलाय. मूर्ती बनवताना पीओपीचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो. पीओपीच्या गणेशमूर्तीवर बंदी आणू नये, असे गणेशमूर्ती कारखानदारांचे म्हणणे आहे. गणेशमूर्तींना देण्यात येणार्‍या रंगांमुळे प्रदूषण होते असे पर्यावरण खात्याचे म्हणणे आहे. तसे असेल तर पर्यावरण खाते सांगेल ते रंग वापरण्यास मूर्ती कारखानदार तयार आहेत. पीओपीला पर्याय म्हणून पर्यावरण खाते शाडू मातीची मूर्ती बनवण्यास सांगत आहेत, परंतु मातीच्या मूर्ती बनविणे व त्यांचा सांभाळ करणे जोखमीचे काम असते. म्हणूनच पीओपीच्या मूर्तींना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी गणेशमूर्तीकारांसोबत उरणचे आमदार महेश बालदी यांच्याकडे जाऊन त्यांच्या व्यथा मांडल्या. या वेळी राज्य अध्यक्ष रविकांत म्हात्रे, सचिव प्रवीण बावधनकर, खजिनदार कैलास पाटील, हमरापूर विभाग गणेशमूर्तिकार अध्यक्ष गोपीनाथ मोकल, सचिव राजन पाटील खजिनदार रोशन नाईक, सदस्य जयेश पाटील, बल्लाळ पाटील, सचिन पाटील, भगवान पाटील, कुणाल पाटील, रवी मोकल, संतोष मोकल, रुपेश पाटील, अरविंद पाटील, दादर सरपंच विजय पाटील, राजू पाटील, अमोल कुंभार आदी उपस्थित होते. या वेळी आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांची दिल्लीत भेट घेऊन गणेशमूर्ती कारखानदारांचे प्रश्न, व्यथा मांडू व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मराठी अर्थशास्त्र परिषदेला 20 लाखांची देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्त समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे …

Leave a Reply