पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजप भटके विमुक्त महिला आघाडीच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी कामोठे येथील विद्या तामखडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 13) तामखडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, भटके विमुक्त आघाडी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, भाजप कळंबोली मंडल अध्यक्ष आबा घुटूकडे, पनवेल मंडल अध्यक्ष गोपीनाथ मुंडे, व्यापारी आघाडी कामोठे अध्यक्ष नानासाहेब मगदूम, कामोठे संयोजक कैलास सरगर, सहसंयोजक उत्तम जाधव आदी उपस्थित होते. विद्या तामखडे यांना भटके विमुक्त आघाडीच्या महिला अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली असून भारतीय जनता पक्षाचा सामाजिक समरसतेचा संदेश उत्तर रायगड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत विविध उपक्रम व कार्यक्रमांतर्गत पोहचवण्याबरोबरच जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिकाधिक मजबूत करणे आणि आगामी काळात विविध निवडणुकांमध्ये पक्षाला मोठे यश मिळवून देण्यासाठी जिल्हा भटके विमुक्त आघाडी काम करेल, अशी अपेक्षा या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त करीत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, तसेच उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विद्या तामखडे भाजपची ध्येयधोरणे व कार्यक्रमांची यशस्वीरीत्या अंमलबजावणी करतील, अशी खात्री बबन बारगजे यांनी व्यक्त केली.