Breaking News

परतीच्या पावसामुळे महावितरणचे नुकसान

कर्जतमध्ये रोज सायंकाळी वीजपुरवठा होतोय खंडित

कर्जत : प्रतिनिधी

परतीच्या पावसामुळे महावितरणचे कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, रोज सायंकाळी वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे, ऑक्टोबर महिना सुरू आहे, त्यामुळे दिवसभर उकाड्याने कर्जतमधील नागरिक हैराण होत आहेत. सध्या रोज सायंकाळी आकाश काळ्या ढगांनी भरून येत आहे आणि वादळी व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे.

या परतीच्या पावसामुळे महावितरणचे कर्जत तालुक्यात मोठे नुकसान होत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

वादळी व विजेच्या कडकडाटासह मंगळवारी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील कळंबोली येथून कर्जत शहरासाठी येणार्‍या मुख्य वीजवाहिनीवर झाड पडले. त्यामुळे वीज प्रवाह खंडित झाला होता. तर नाना मास्तरनगर ते माळवाडी रोडजवळ झाडे पडल्याने वीजवाहिन्यांचे नुकसान झाले. त्यामुळे मंगळवार सांयकाळपासून रात्रीपर्यत वीजप्रवाह खंडित झाला होता, मात्र महावितरण अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली कर्मचार्‍यांनी युद्धपातळीवर काम करून वीजपुरवठा पूर्ववत केला.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply