Breaking News

डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

कोपनहेगन ः वृत्तसंस्था

भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने गुरुवारी थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानविरुद्ध तीन सेटमध्ये रोमहर्षक विजय मिळवत डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला एकेरीत सिंधूने 67 मिनिटांच्या झुंजीनंतर बुसाननवर 21-16, 12-21, 21-15 असा विजय मिळवला. ऑगस्ट महिन्यात टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणार्‍या सिंधूची विश्रांतीनंतरची ही पहिलीच स्पर्धा आहे. पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत 14व्या स्थानावर असलेल्या किदम्बी श्रीकांतचा मात्र क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या केंटो मोमोटापुढे निभाव लागला नाही. पहिल्या गेममध्ये मोमोटाला झुंजवणार्‍या श्रीकांतने 21-23, 9-21 असा पराभव पत्करला. मिश्र दुहेरीत टँग शून मॅन आणि से यिंग सुएट जोडीने धु्रव कपिला आणि एन. सिक्की रेड्डी जोडीचे आव्हान 21-17, 19-21, 21-11 असे मोडीत काढले.

Check Also

पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या …

Leave a Reply