मुंबई ः प्रतिनिधी
क्रुझ ड्रग्जप्रकरणी आर्यन खानच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पुढची तारीख दिली आहे. आर्यनसह इतर आरोपींसंदर्भातील युक्तीवादाला बुधवारी अधिक वेळ लागल्याने न्यायालयाने जामीनावर गुरुवारी (दि. 28) पुन्हा सुनावणीचा निर्णय घेतला.
आर्यन, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. ज्येष्ठ वकील आणि माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यनची बाजू मांडली. अरबाजसाठी ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी युक्तीवाद केला. तर अमली पदार्थविरोधी दलाकडूनही (एनसीबी) जोरदार युक्तीवाद करण्यात आला. साक्षीदारांना फोडण्याचे आणि पुराव्यांशी छेडछाडीचा प्रयत्न केला जात असल्याचे एनसीबीने या वेळी न्यायालयात सांगितले.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper