Breaking News

युवीने सचिनला दिल्या खास शुभेच्छा

मुंबई : प्रतिनिधी

भारतात क्रिकेट हा धर्म मनाला जातो आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देव मानतात. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा 46वा वाढदिवस बुधवारी (दि. 24) साजरा झाला. सध्या क्रिकेटच्या मैदानावर उतरणारा प्रत्येक नवा क्रिकेटपटू त्याला आदर्श मानतो. याच ‘क्रिकेटच्या देवा’ला मुंबई इंडियन्सचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंग आणि इतर खेळाडूंनी खास व्हिडीओतून शुभेच्छा दिल्या आहेत.

युवराज म्हणतो की, सचिन हा सर्वकालीन सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याच्या याच कारकिर्दीच्या जोरावर त्याला आपण ‘मास्टर ब्लास्टर’ म्हणून ओळखतो. आम्ही तुमच्यावर असेच प्रेम करत राहू आणि तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

मुंबईचा नवोदित खेळाडू आदित्य तरे यानेदेखील सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सचिन सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! नव्या दमाच्या तरुणांना क्रिकेटपटू बनण्यासाठी प्रेरित करणार्‍या तुमचे आभार! आजही प्रत्येक तरुण मुलगा तुमच्याकडे पाहून क्रिकेट खेळण्यास सुरुवात करतो. यासाठी सचिन सर तुमचे खूप धन्यवाद, असे आदित्य तरे मुंबई इंडियन्सने तयार केलेल्या व्हिडीओत म्हणाला.

Check Also

अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….

काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …

Leave a Reply