आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक
पनवेल : वार्ताहर
भाजप युवा नेते हॅप्पी सिंग यांच्या माध्यमातून रविवारी (दि. 31) कामोठे येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात कामोठेवासीयांना उटणे व पणतीचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी त्यांच्या कार्याचे कौतुक करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, विविध सामाजिक बांधिलकीद्वारे येथील कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक घराघरात पोहचण्याचे काम करीत आहेत.
या वेळी आयोजक युवा नेते हॅप्पी सिंग, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, तसेच संस्थापक अध्यक्ष हरजिदंर कौर हॅपी सिंग, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, विजय चिपळेकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, युवा मोर्चाचे हर्षवर्धन पाटील, रमेश म्हात्रे, प्रकाश पाटील, प्रदीप भगत, भाऊ भगत, रवी गोवारी, आरपीआय कामोठे शहर अध्यक्ष मंगेश धिवार, रवी कांबळे, नाना मगदूम, आकाश कवडे, भटके विमुक्त महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विद्या तामखडे, महिला मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष वनिता पाटील, सचिव फातिमा आलम, चिटणीस दीपाली तिवारी, उपाध्यक्ष साधना आचार्य रश्मी भारद्वाज, सदस्य लता गाडगे, सोनाली खरटमोल, विद्या कावले, वर्ष शेलार, मनीषा बनवे, सुरेखा लांडे, वैशाली जगदाळे, ललिता इन्कर आदी उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या विविध योजना भारतवासीयांसाठी राबविल्या होत्या. त्या सर्व योजना कामोठे वासियांसाठी वर्षभरापासून राबवित आहोत. आजही बाजार भावापेक्षा कमी दरात दिवाळी फराळाचे साहित्य विक्री चालू आहे. तसेच हॅप्पी सिंग यांनी सुद्धा कामोठे वासियांसाठी उटणे व पणतीचे वाटप केले ते कौतुकास्पद आहे.
हॅप्पी सिंग यांनी सांगितले की, अशा प्रकारचे सामाजिक बांधिलकीचे उपक्रम आम्ही सातत्याने राबवित असतो. त्यामुळे कामोठेवासीयांच्या मनात आमच्याबद्दल आपुलकी व आत्मियता आहे. तर नगरसेवक विकास घरत यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात समाजकार्य केले आहे. तर नागरी प्रश्नावरसुद्धा सिडकोविरोधात आवाज उठवला आहे. त्यामुळेच कामोठेवासीय भाजपच्या पाठीशी ठाम उभे आहेत.