सुरमयी ‘दिवाळी पहाट’ने रसिक मंत्रमुग्ध

पनवेल : रामप्रहर वृत्त

दीपावली सण विविध फराळ, फटाक्यांची आतषबाजी, रांगोळी, किल्ले बांधणी, शुभेच्छा आदींचा आगळावेगळा व उत्साहाचा सर्वात मोठा सण असतो. या सणानिमित्त पनवेल तालुका सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष उमेश चौधरी यांच्या पुढाकाराने पनवेल तालुका सांस्कृतिक सेल व नादब्रह्म साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रांजणपाडा (खारघर) येथे झालेली ‘दिवाळी पहाट’ प्रफुल्लित व उल्हासमय वातावरणात झाली. या सुरमयी कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दीपावली सणात सुरांच्या अविष्कारांनाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. उमेश चौधरी गेल्या 10 वर्षांपासून सातत्याने या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. यंदा दिवाळी पहाटचे हे अकरावे वर्ष होते.  एकूण सोनेरी पहाट आणि सुरांची सुरेल बरसात होत दिवाळी पहाटने रसिकांना मंत्रमुगध केले. खारघर सेक्टर 27 मधील मॉर्निंग प्ले स्कूल समोरील प्लॉट क्रमांक 36 येथे हा कार्यक्रम झाला. या सांस्कृतिक सोहळ्यात प्रसिद्ध गायक पंडित नंदकुमार पाटील, भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी, मोतीराम कडू, अरुण म्हात्रे, जगन्नाथ मढवी यांचे गीत गायन सादर झाले. या वेळी पखवाजवर सुनिल म्हात्रे, किरण भोईर, तबला निषाद पवार व विनायक प्रधान, हार्मोनियमवर नंदकुमार कर्वे यांची, तर सूत्रसंचालक म्हणून नितेश पंडित यांची साथ साथ लाभली. ही संगीतमय मैफल यशस्वी करण्यासाठी आयोजक पनवेल तालुका सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष रायगड भूषण पंडित उमेश चौधरी, मंगेश चौधरी व अक्षय चौधरी आणि सहकार्‍यांनी विशेष मेहनत घेतली.

Check Also

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami W dzisiejszym artykule skupimy się na tym, …

Leave a Reply