Breaking News

दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी

महाड ः प्रतिनिधी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड शहरानजीक गांधारपाले गाव हद्दीत शनिवारी (दि. 6) दुपारी एक दुचाकी रस्त्यावर घसरली. या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

ज्ञानेश्वर रामचंद्र पाथरटकर आणि हरिश्चंद्र बाळू देवळे (दोघे रा. देहगाव, दापोली) हे दोघे दुचाकी (एमएच 4-जेझेड 5968)वरून दापोली ते दिवा (ठाणे) असा प्रवास करीत होते. यांची मोटरसायकल शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील गांधारपाले  गावाच्या हद्दीत आल्यावर स्लीप झाली. या अपघातात ज्ञानेश्वर पाथरटकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेले हरिश्चंद्र देवळे गंभीर जखमी झाले. जखमी देवळे यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढे हलवण्यात आले. या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Check Also

उलवेत 13 मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे …

Leave a Reply