Breaking News

कर्जतमध्ये पावसाच्या सरी

वाहतूक कोंडी, भाऊरायांचा हिरमोड

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

परतीच्या पावसाचा तडाखा शनिवारी (दि. 6) कर्जतला बसला. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने सुरुवात केली. भाऊबीजेचा दिवस असल्याने बहिणीकडे जाणार्‍या बंधुरायांची एकच त्रेधातिरपीट उडाली.

कर्जत चारफाटा परिसरात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. चौक बाजूकडे सुमारे दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे भाऊबीजेला जाणार्‍या बंधुरायांचे वेळापत्रक कोलमडले. त्यातच संध्याकाळी परतीच्या  पावसाने विजांच्या कडकडाटासह दमदार हजेरी लावल्याने बंधुरायांचा हिरमोड झाला.

Check Also

रिटघर येथे लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवी वर्ष शुभचिंतन समारंभ उत्साहात

विद्यालयासाठी ४० लाखांची घोषणा पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, थोर देणगीदार, …

Leave a Reply