
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनामुळे प्रवाश्यांचे हाल होत आहेत. उरणमध्येही एसटी कर्मचार्यांच्या सुरू असणार्या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेस पोसतांडेल यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
उरण बस डेपोतून सुटणार्या दादर, पुणे शिर्डी, पेण, अलिबाग, पनवेल, ठाणे आदी गाड्यांबरोबर ग्रामीण भागात जाणार्या बंद असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे खाजगी वाहनाची भाडे वाढ झाली आहे. प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. एसटी कर्मचार्यांचा विविध मागण्यांसाठी तसेच महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण करण्यासाठी एसटी कर्मचारी संघटनेमार्फत राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनास महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेस पोस तांडेल यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामगारांच्या पाठीशी मी ठामपणे उभा असल्याचा विश्वास सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper