
पनवेल ः प्रतिनिधी
शिक्षण हेच जीवन आहे. शिक्षणामुळे केवळ ज्ञानच मिळते असे नव्हे; तर जगण्याचे मार्गही उलगडतात, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री ए. नारायणस्वामी यांनी रविवारी (दि. 14) कामोठे येथे केले. कामोठे येथील नौपाडा, तसेच चिंचपाडा येथे एसजीटी इंटरनॅशनल स्कूल सुरू झाले आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्कूलचे उद्घाटन मंत्री ए. नारायणस्वामी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, महापालिका स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक विजय चिपळेकर, गोपीनाथ भगत, नगरसेविका अरुणा भगत, कुसूम म्हात्रे, संतोषी तुपे, भाजप भटके विमुक्त महिला आघाडी अध्यक्ष विद्या तामखेडे, महिला मोर्चा कामोठे अध्यक्ष वनिता पाटील, भाजप नेते विनोद साबळे, कर्णा शेलार, हॅप्पी सिंग, मनीषा वनवे, शशिकांत भगत, आयआरएएस सुनील वरे, मुंबई विद्यापीठाचे बी. एन. गायकवाड, पनवेल महापालिकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. धुपे, कार्यक्रमाचे आयोजक तथा एसजीटी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन रमेश तुपे, सेक्रेटरी शुभम तुपे, सचिन अवले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री ए. नारायणस्वामी यांनी सुरुवातीलाच आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या भाषणाने प्रभावित झालो असल्याचे सांगितले तसेच रमेश तुपे यांचे शैक्षणिक कार्य मोलाचे आहे, असे नमूद केले.
मंत्रीमहोदय आपल्या समाजातील एक युवक स्वत:चे क्षेत्र सोडून शिक्षणाच्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. त्याचे कौतुक केले पाहिजे या भावनेने येथे आल्याबद्दल त्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी धन्यवाद दिले. अशा प्रकारच्या कार्यक्रमाने हा देश समृद्ध होत जाईल, असेही ते म्हणाले तसेच रमेश तुपे यांनी शैक्षणिक क्षेत्रात जे पाऊल उचले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, सावित्री बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सच्या वतीने पुष्पकनगर येथे सावित्री इनक्लेव्ह ही नूतन इमारत बांधण्यात येत आहे. या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री ए. नारायणस्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
आपला देश बदलतोय -आमदार प्रशांत ठाकूर
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात, पूर्वी बहुतांशी सिने कलावंतांना पद्म पुरस्कार दिले जात होते, पण आज लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी काम करणार्यांना पुरस्कार मिळतोय हे बघून आपला देश बदलताना दिसतोय असे सांगून यासाठी पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणार्या ए. नारायणस्वामी यांचे विशेषत्वाने आभार मानले.
RamPrahar – The Panvel Daily Paper