Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने कामोठ्यातील पेट्रोल पंपाचे काम सुरू

भाजप नगरसेवक, पदाधिकार्‍यांकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे कामोठे सेक्टर 18 येथे इंडियन ऑईल या पेट्रोल पंपाचे काम चालू झाले आहे. भाजप नगरसेवक, पदाधिकारी यांनी शुक्रवारी

(दि. 19) या कामाची पाहणी केली. या वेळी कामोठेमधील नगरसेवक विकास घरत, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, समाजसेवक रवींद्र म्हात्रे, समाजसेवक रवी  गोवारी, भटके विमुक्त सेल रायगड जिल्हा महिला अध्यक्षा विद्या तामखडे, युवा मोर्चा सरचिटणीस नवनाथ भोसले, महिला मोर्चा चिटणीस सुरेखा लांडे, नारायण सोनावणे, बूथ अध्यक्षा कल्पना जाधव, बूथ अध्यक्ष अनिता शेट्टी, जयकुमार डिगोले, युवा मोर्चा चिटणीस सुरेंद्र हल्लीकर, जयश्री गोडगे, गणेश शिरसेकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते आणि सेक्टर 18 मधील सोसायटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply