Breaking News

बास्केटबॉल निवड चाचणी स्पर्धा

पनवेल ः वार्ताहर

बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगडच्या वतीने 18 वर्षाखालील मुलांच्या जिल्हा निवड चाचणीचे आयोजन रविवारी (दि. 28) सकाळी 7.30 वा. खांदा कॉलनीतील महात्मा स्कूल मैदानात करण्यात आले आहे. या निवड चाचणीतून निवडलेला संघ 12 ते 15 डिसेंबर  रोजी औरंगाबाद येथे होत असलेल्या 18 वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल. निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडूंनी आपले दोन पासपोर्ट साईज फोटो, वयाचा पुरावा आणि रहिवासी पुरावा सोबत घेऊन यावे. उशिरा आलेल्या खेळाडूंना प्रवेश मिळणार नाही. 18 वर्षाखालील सर्व बास्केटबॉलपटूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सचिव नईम चिकटे (9773913434), विवेक गोरे (8169657919), आशिष पाटणे (9029596880), आकाश चाकणे (9029596949) यांच्याशी संपर्क साधावा.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply