गोव्यात काँग्रेसच्या आणखी एका माजी मुख्यमंत्र्याचा राजीनामा

पणजी : मागील काही महिन्यांपासून गोव्यात काँग्रेसला गळती लागलेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुइजिन्हो फेलेरो यांनी राजीनामा देऊन ते तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर आता गोव्यातील आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसमधून फारकत घेतली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रवी नाईक यांनी मंगळवारी (दि. 7) आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नाईक हे पोंडा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी गोवा विधानसभा अध्यक्ष राजेश पाटनेकर यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. दरम्यान, रवी नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Check Also

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало Аналитические функции на платформе 1xbet зеркало предоставляют пользователям …

Leave a Reply