पनवेल ः रामप्रहर वृत्त
बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता 23 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे.
या संदर्भात बुधवारी (दि. 15) झालेल्या सुनावणीच्या वेळी दोन्ही बाजूंचे वकील उपस्थित होते. ईडीतर्फे विशेष सरकारी गोन्सालवीस आणि ईडीचे अधिकारी रोहित कुमार उपस्थित होते. कर्नाळा बँकेतील घोटाळ्यामुळे माजी आमदार विवेक पाटील आणि शेकाप नेते, कार्यकर्ते यांच्या जामीन मिळण्याच्या अपेक्षेला पुन्हा एकदा खो बसला आहे. घोटाळ्याचे आर्थिक स्वरूप खूपच मोठे असल्याने न्यायालयीन कारवाईला वेळ लागत आहे.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper