Breaking News

सेंट्रल पार्कची वेळ वाढवून द्यावी

नगरसेविका नेत्रा पाटील यांची सिडको प्रशासनाकडे मागणी

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघर शहरातील सेंट्रल पार्कची वेळ वाढवून देण्याची मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सिडकोचे सहाय्यक कार्यकारी अभियंता सागर संधू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

सध्यस्थितीत सेंट्रल पार्क सकाळी 9 वाजता बंद करण्यात येते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक व्यायाम करण्यासाठी व फिरण्यासाठी येतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची मागणी आहे की थंडीचे दिवस असल्याकारणाने पार्कची वेळ वाढवून सकाळी 10.30 वाजेपर्यंत करण्यात यावी. जेणेकरून नागरिकांना कोवळ्या उन्हाचा व नैसर्गिकरीत्या मिळणार्‍या ‘ड’ जीवनसत्त्वाचा अधिकाधिक लाभ घेता येईल. यासंदर्भात ज्येष्ठ नागरिकांनी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्याकडे सेंट्रल पार्कची वेळ वाढविण्यासाठी मागणी केली होती.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply