Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील स्पर्धा परिक्षा विभागाने वतीने शनिवारी (दि. 8) स्पर्धा परीक्षा कशी करावी? या विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

प्रस्तुत कार्यक्रमास मुंबई विद्यापीठाचे भूगोल विभागाचे प्रा. सुशेन आघाव हे प्रमुख वक्त्या म्हणुन उपस्थित होते. या व्याख्यानामध्ये प्रा. सुशेन आघाव यांनी विद्यार्थ्यांना शंकाचे निरसन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय मराठे आयक्यूएसीचे समन्वयक प्रा. महेश्वरी झिरपे, व इतर प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रध्दा शिंदे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तसेच महाविद्यालयातील डिएलएलई विभागप्रमुख प्रा. महेश धायगुडे, यांनी प्रमुख वक्त्या प्रा. सुशेन आघाव यांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. मानसी शहा यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी प्रा.रेवान शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिध्देश्वर गडदे यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply