महाड ः प्रतिनिधी
वेदा जनजागृती मंचतर्फे राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या नावाने महिला क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या बहुउद्देशीय सभागृहात झाला. प्रथम आलेल्या
महाड पंचायत समिती संघाला या वेळी आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
कोरोनाचे नियम पाळून पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला. उपविजेता रायझिंग संघ आणि सहभागी जगदंबा शिक्षक संघ, दिशा अॅबॅकस संघांचाही सन्मान करण्यात आला. स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज करुणा कदम, उत्कृष्ट गोलंदाज पूर्वा बारटक्के, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पल्लवीताई, सामनावीर मंजुषाताई आणि मालिकावीर अश्विनीताई ठरल्या. त्यांना गौरविण्यात आले. पंचगिरी बजावणारे राहुल सावंत, स्वप्नील करकरे व प्रवीण जोशी यांनाही सन्मानचिन्ह देण्यात आले.
डॉ. दिगंबर गिते यांच्या संकल्पनेतून वेदा जनजागृतीच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत केल्या जाणार्या कार्याचे व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांनी कौतुक केले. पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, कीर्तने गुरुजी, रोटरी क्लबचे अध्यक्ष द्वारकानाथ गुरव, महाड संकल्प सेवा ग्रुपचे संजय शेठ, नगरपंचायतीचे प्रतिनिधी प्रथमेश, पत्रकार जैतपाल, प्रा. विश्वास पाटील आदींनी डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद ठाकूर यांनी केले, तर आभार प्रा. शेगोकर यांनी मानले.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper