Breaking News

उलवे नोड प्रीमियर लीगचा जावळे संघ मानकरी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे उलवे नोड प्रीमियर लीग 2022 ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी (दि. 9) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाला. या स्पर्धेत निलेश इलेव्हन जावळे या संघाने विजेतेपद पटकाविले असून या संघाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात पाच दिवस उलवे नोड प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा रंगली. या स्पर्धेत संघमालक प्रमोद कडू यांच्या निलेश इलेव्हन या संघाने विजेतेपद पटकाविले, तर संघमालक सुधीर ठाकूर यांचा खारकोपर किंग्ज संघ उपविजेता ठरला. स्पर्धेत मालिकावीर म्हणून प्रसाद घरत, उत्कृष्ट फलंदाज विनेश डोलकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक भानुदास म्हात्रे, उत्कृष्ट गोलंदाज राज बस्ताव यांची निवड करण्यात आली.
विजेते संघ आणि वैयक्तिक उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या खेळाडूंना बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, सदस्य रोशन म्हात्रे, आशिष पाटील, आयोजक सचिन घरत, सुधीर ठाकूर, अमर पाटील, अमर कडू, किशोर पाटील मनोज नाईक, धीरज ओवळेकर, प्रमोद कडू यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply