पनवेल : रामप्रहर वृत्त
येथील पैलवान रूपेश पावशे याची नेपाळमधील पोखरा येथे 6 ते 9 फेब्रुवारीदरम्यान होणार्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा एशियन स्पोर्ट्स अॅण्ड फिजिकल फिटनेस बोर्डच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा पैलवान असलेला रूपेश पावशे हा पनवेल तालुक्यातील नितळस गावचा असून चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात क्रीडा शिक्षक आहे. रूपेशने यापूर्वी स्पोर्ट्स अॅण्ड फिजिकल फिटनेस बोर्डच्या वतीने आग्रा येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी पैलवान रूपेशचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन, असे पैलवान रूपेश पावशे याने प्रतिक्रिया देताना सांगितले.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper