पनवेल ः रामप्रहर वृत
सिडकोच्या जाचातून सुटका होऊन पनवेल महानगरपालिकेच्या उत्कृष्ट दर्जाचा सेवांचा लाभ नागरिकांना व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 18) बैठकीत बोलताना दिली.
पनवेल महापालिकेकडे सिडकोकडून हस्तांतरित झालेल्या सुविधांसंदर्भात मंगळवारी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत प्रभाग समिती ब आणि क मधील सिडकोकडून हस्तांतरित झालेल्या
सुविधांची माहिती घेऊन वसाहतींमधील प्रलंबित कामे कधीपर्यंत पूर्ण होतील याचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीला उपमहापौर सीताताई पाटील, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, प्रभाग समिती सभापती प्रमिला पाटील, अरुणा भगत, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, बबन मुकादम, अमर पाटील, विकास घरत, नगरसेविका मोनिका महानवर, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, उपायुक्त सचिन पवार, भाजप नेते प्रदिप भगत यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.नगरसेविका सीताताई पाटील यांची उपमहापौरपदी निवड झाल्याबद्दल या वेळी त्यांचे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, सहआयुक्त वंदना गुळवे, सुवर्णा दखणे आणि नगररचना विभागाच्या ज्योती कवाडे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
Check Also
स्व. भागुबाई चांगू ठाकूर यांच्या १३व्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मातोश्री स्व. …
RamPrahar – The Panvel Daily Paper