Breaking News

वांगणी तर्फे वाजे गु्रप ग्रामपंचायत हद्दीतील तलावाचे सुशोभीकरण

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील वांगणी तर्फे वाजे गु्रप ग्रामपंचायत हद्दीतील तलावाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीमधून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 20) भूमिपूजन झाले.
पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची अनेक कामे सुरू आहेत. अशाच प्रकारे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आठ लाख 88 हजार रुपयांच्या जिल्हा नियोजन निधीमधून वांगणी तर्फे वाजे गु्रप ग्रामपंचायत हद्दीतील तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सरपंच सुरेखा पवार, सदस्य लीलाबाई कातकरी, पाली देवद जि. प. विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, पं. स. अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, माजी सरपंच गुरूनाथ भोईर, माजी उपसरपंच संतोष शेळके, अशोक पवार, अनंता घरत, गणेश पाटील, प्रमोद पाटील, प्रवीण पालव, संतोष पाटील, मयुर घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply