पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून साई येथे विविध विकासकामे करण्यात येणार असून या कामांचा भूमिपूजन सोहळा शनिवारी (दि. 22) सकाळी 10.30 वाजता भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते होणार आहे.
राज्य मार्ग क्रमांक 86 ते साई जोडरस्ता (खर्च 25 लाख रुपये) आणि साई येथील अंतर्गत रस्त्यास पेव्हर ब्लॉक बसविणे (खर्च 10 लाख रुपये) ही कामे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात येणार आहे.
Check Also
अष्टपैलू गायिका आशा भोसले
आशा भोसले… सुरुवात कुठून करावी असा या व्यक्तिमत्वाची खोलवर ओळख करून देताना मला प्रश्न पडतोय …
RamPrahar – The Panvel Daily Paper