कर्जत : बातमीदार
तालुक्यतील नेरळ धामोते येथील डिस्कव्हर रिसॉर्टच्या व्यवस्थापकाने काही कामगारांना अचानक कामावरून कमी केले होते. आपल्याला न्याय मिळावा, यासाठी निलंबित काही कामगारांनी रिसॉर्टसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषणच्या तिसर्या दिवशी शुक्रवारी (दि. 28) त्या कामगारांना व्यवस्थापनाने पुन्हा कामावर घेतले आहे.
डिस्कव्हर रिसॉर्टमध्ये काम करणार्या 17 कामगारांना व्यवस्थापकाने कोणत्याही प्रकारे पूर्वसूचना न देता 12 जानेवारी रोजी कामावरून काढले होते.
आपल्याला पुन्हा कामावर घ्यावे यासाठी भरत हिरू कराळे, भास्कर दत्तू विरले, धनेश शरद म्हसकर, नरेश खंडू विरले, अनंता दत्तू विरले, धर्मा शिवराम पेरणे या निलंबीत कामगारांनी बुधवारपासून रिसॉर्टच्या गेटसमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते.
रिसॉर्ट व्यवस्थापनाने शुक्रवारी उपोषणकर्त्या कामगारांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांना कामावर घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या कामगारांनी उपोषण मागे घेतले.