Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात चर्चासत्र

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे गुरुवारी (दि. 17) करिअर गाईडंस प्लेसमेंट अ‍ॅण्ड काऊंसेलिग सेलतर्फे भारतातील लोकसेवक, सरकारी अधिकारी यांची भूमिका या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. महादेव चव्हाण यांनी केले. विद्यार्थ्यांचे विविध गट करून त्याचे लोकसेवक आणि जनता असे दोन प्रमुख भाग होते. विविध गटामध्ये विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेऊन तयार केलेल्या लोकसेवक आयोगाची माहिती जनतेला देण्याचे काम केले. विद्यार्थ्यांनी लोकसेवकांना प्रश्न विचारले. लोकसेवकांनी गटाच्या प्रश्नांना उत्तर देत जनतेला संबोधित केले. लोकसेवकांच्या भुमिकेमध्ये सुरक्षा विभाग, पंचायत समिती, सामाजिक न्याय व व्यवस्थापन विभाग या गटांचा समावेश होता. जनता तथा लोकसेवकांनी नमुद केलेल्या आयोगामध्ये नियुक्त असलेल्या लोकसेवकांच्या भूमिका उलगडून सांगितल्या तसेच एकमेकांना प्रतिप्रश्न करत सविनय चर्चा केली. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिध्देश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply