Breaking News

गुरव समाजातील तरुणांनी उद्योजक बनावे -बंडू खंडागळे

पेण : प्रतिनिधी

समाजातील तरुणांनी उद्योजक बनावे, त्यासाठी त्यांना संघटनेच्या वतीने मदत करण्यात येईल, अशी ग्वाही गुरव समाज ठाणे-रायगड-मुंबई या संस्थेचे अध्यक्ष बंडू खंडागळे यांनी पेण येथे दिली.

गुरव समाज ठाणे-रायगड-मुंबई या संस्थेची सभा पेण पी. के. रिसॉर्ट येथे झाली. त्यावेळी बंडू खंडागळे बोलत होेते. समाज संघटनेत आता युवा पिढीला स्थान देणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

बारा बलुतेदारांमध्ये गुरव समाजाची संख्या नगण्य आहे. त्यामुळे गुरव समाजाने एकत्र येणे आणि संघटना मजबूत करणे गरजेच आहे. केवळ गुरवकीवर अवलंबून न राहता युवकांनी शिकून नोकरी किंवा उद्योग करावा, असा सल्ला संस्थेचे सल्लागार दत्ताजीराव मसुरकर यांनी  दिला.

नवीन सभासद बनविणे, गुरव जोडो अभियान राबविने, नवीन सभागृह उभारण्यासाठी निधी उपलब्ध करणे, रायगड-ठाणे-मुंबई कार्यक्षेत्रातील समाजबांधवां सोबत गाव बैठका घेणे, तसेच मे महिन्याच्या अखेरीस समाजाच्या महामेळाव्याचे आयोजन करणे या बाबत या सभेत चर्चा झाली. संस्थेचे पदाधिकारी व स्थानिक समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

Check Also

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …

Leave a Reply